
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो
२४ नोव्हेंबर ला सान्वीच्या आईसमोर सिद्धार्थ आणि अनु च्या लग्नाचा खुलासा होईल . आता चाललेल्या भागांनुसार सान्वी ने आजींना म्हटलं कि मला तत्ववादी घराण्याची सून व्हायचं आहे. आणि दीनानाथ काका आणि त्यांची बायको स्मिता, सान्वी ला तिच्या सगळ्या कुरघोड्यांमध्ये मदत करत आहेत आणि त्याशिवाय दीनानाथ काकांनी सान्वी च्या आई कडून भाऊबीज करून घेतली आहे आणि तिच्या आईला वचन दिल आहे कि सान्वीच्या नेहमीच मी पाठीशी उभा असेन आणि तिच्या भल्यासाठी नेहमी च कार्यरत राहीन .

नारी शक्ती अवॉर्ड दरम्यान घरामध्ये एकूण सदस्य किती आहेत हा प्रश्न विचारल्यावर सान्वी ने चुकीचे उत्तर दिले पण अनुश्री ने ११ हे बरोबर उत्तर दिले. आणि घरातील सदस्यांची नावे सांगत असताना अनुश्री ने सम्राट ह्या नावाचा उल्लेख केला. सम्राट घरापासून लांब आहे पण घरचा सदस्य आहे असं अनुश्री म्हणाली. सम्राट म्हणजे दीनानाथ काकांचा मुलगा.
वनश्री देवी च्या ग्रुप मुळे आपल्याला असं कळत आहे कि आता संयोगिता हि अनुश्री सोबत चांगली वागत आहे आणि दुर्गा मॅडम देखील सर्व गोष्टींकडे नीट पाहिलं तर असं वाटत आहे कि अनुश्री सोबत चांगल्या वागतील.

आमचं prediction असं आहे कि सिरीयल रंगतदार ठेवण्यासाठी सान्वी चे तत्ववाद्यांच्या घरात असणे महत्वाचे आहे. आणि त्यासाठी तिला तिथे लग्न करून कायदेशीर रित्या त्याघराची सून म्हणून राहण्याशिवाय काही पर्याय दिसत नाही. आणि काही एपिसोडस पासून सम्राट चे हि नाव सतत घेतले जात आहे.
त्यावरून आमचा असा अंदाज आहे कि सम्राट आणि सान्वी चे लग्न होऊन सान्वी तत्ववादी घराण्याची सून बनून घरात प्रवेश करेल.
हा अंदाज खरा होईल कि नाही ते आपल्याला लवकरच सिरीयल मधून कळेल. तुमचा हि काही अंदाज असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये आम्हाला जरूर सांगावा.