
२०१८ मध्ये आलेला फर्जंद हा चित्रपट त्यावेळी प्रेक्षकांना खूप आवडला. या फिल्म चे लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी त्यात कोंडाजी फर्जंद यांची कामगिरी दाखवली होती. 15 November २०१९ मध्ये त्यांनी फत्तेशिकस्त हि फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला आणली, जी अजूनही थिएटर्स मध्ये चालू आहे. लोंकांचा प्रतिसाद या फिल्म ला पण तितकाच आहे, जितका फर्जंद या फिल्म ला होता. या फिल्म मध्ये त्यांनी मराठ्यांच्या Surgical Strike बद्दल दाखविले आहे.
या दोन्ही फिल्म च्या अभूतपूर्व यशानंतर ते आणखी एक नवी फिल्म प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ज्याचे नाव आहे, “जंगजौहर”. हि फिल्म देखील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
या फिल्मचे टीझर आला आहे. यामध्ये दिग्पाल लांजेकर यांनी बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेबद्दल माहिती दिली आहे. हि फिल्म प्रेक्षकांसाठी जून २०२० मध्ये येईल असेही दिग्पालजी म्हणाले आहेत. या फिल्ममध्ये काय असेल ते आपण नक्की पाहूच. आणि या फिल्म ला देखील फर्जंद आणि फत्तेशिकस्त सारखाच प्रतिसाद असेल आणि असावा या शुभेच्छा.